“Damini Squad Reinforced with 10 Female Officers”
छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी १० अतिरिक्त महिला पोलिस अंमलदार देण्यात आले आहेत. शहरातील महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि दामिनी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दामिनी पथकाचे काम दिवस आणि रात्री सुरू असते, त्यामुळे अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. त्यामुळे नव्या १० महिला पोलिस अंमलदारांच्या नियुक्तीमुळे शहरातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक बळ मिळणार आहे.
यासोबतच, लवकरच पथकाला चार नवीन वाहनेही दिली जाणार आहेत. यामुळे गस्त अधिक जलद आणि प्रभावी होईल, तसेच महिलांच्या मदतीसाठी दामिनी पथक तत्काळ पोहोचू शकेल.
दामिनी पथक हे केवळ महिला सुरक्षेपुरतेच मर्यादित नसून, बालविवाह रोखण्यासाठी तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेत आहे. विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीही पथक कार्यरत आहे.
शहरातील महिलांना कोणत्याही प्रकारच्या छेडछाड, अत्याचार किंवा गैरवर्तनाला सामोरे जावे लागू नये, यासाठी दामिनी पथकाच्या गस्त वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिला आणि मुलींना अधिक सुरक्षित वातावरण मिळणार आहे, तसेच दामिनी पथकाचे कार्यक्षेत्र आणखी प्रभावी होईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*