“5 Lakh Women Excluded from CM Majhi Ladki Bahin Scheme”

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल ५ लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली. विशेष म्हणजे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या २ लाख ३० हजार महिलांचा समावेश आहे.

महायुती सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू केली होती. या योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. यामुळे महायुतीला निवडणुकीत मोठा फायदा झाला. मात्र, सध्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

विशेष म्हणजे इतर सरकारी योजनांतील लाभार्थ्यांनीही ही मदत घेतल्याचे आढळून आल्याने सरकारने काटेकोर पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटद्वारे अधिकृत माहिती दिली.

त्यांनी स्पष्ट केले की, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या २.३० लाख लाभार्थींव्यतिरिक्त ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या १.१० लाख महिलांची नावे हटवण्यात आली आहेत.

याशिवाय, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या तसेच स्वतःहून योजना सोडणाऱ्या १.६० लाख महिलांची नावेही योजनेतून कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण ५ लाख महिला लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, सर्व पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,696 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क