मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या तन्यदायी सोहळ्याची आज विसर्जन मिरवणुकीने सांगता होणार आहे. सकाळ-संध्याकाळ मनोभावे आरती, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, सजीव-निर्जीव देखावे आणि भंडाऱ्यांसह गणेश भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला. आता सर्वजण पुढील वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पाला साद घालत आहेत, “निरोप घेतो देवा, आम्हा आज्ञा असावी” अशी प्रार्थना करत भावपूर्ण निरोप देत आहेत.
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक
शहरातील प्रमुख विसर्जन मिरवणुका राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर, गारखेड्यातील गजानन मंदिर चौक, सिडको-हडको परिसरातील आविष्कार कॉलनी चौक, तसेच सातारा-देवळाई परिसरातून सुरू होणार आहेत. या मिरवणुकांमध्ये हजारो भक्तगण सहभागी होणार असून, ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे विसर्जन होणार आहे.
सिडको व्यापारी महासंघाची परंपरा कायम
सिडको व्यापारी महासंघातर्फे यावर्षीही मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांसाठी पुरी-भाजी वाटपाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. आविष्कार कॉलनी चौकात पुरी-भाजी वाटप होईल. यंदा ६ क्विंटल पुरी-भाजी तयार करण्यात आली असून, रात्रीपासूनच तयारी सुरू आहे. पुरी-भाजी तयार करून तिचे व्यवस्थित पॅकिंग करून वाटप करण्यात येणार आहे.
बुधवारी छावणी गणेश महासंघाची मिरवणूक
छावणी गणेश महासंघाची श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक बुधवारी (दि. १८ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता निघणार आहे. होलिक्रॉस इंग्रजी शाळेच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक विहिरीत मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकांच्या या मंगलमय वातावरणात गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही विसर्जनाला प्राधान्य देत, शांतता आणि भक्तिभावाने उत्सवाची सांगता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*