गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त आज शहरातून विविध ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नियोजन केले असून, मुख्य मिरवणूक मार्गासह सिडको, हडको आणि गारखेडा परिसरातील १९ मार्ग संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. नागरिकांनी या बंदीचा विचार करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) धनंजय पाटील यांनी दिली.
बंद राहणारे प्रमुख मार्ग:
1. संस्थान गणपती ते गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.
2. शहागंज चमनमार्गे भडकलगेट.
3. जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार.
4. निजामोद्दीन दर्गा रोड ते शहागंज चमन.
5. चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा.
6. लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
7. कामाक्षी लॉज ते सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया मार्ग.
सिडको, हडको आणि गारखेडा परिसरातील मिरवणूक मार्ग:
1. चिश्तिया चौक ते आविष्कार चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा.
2. ओंकार चौक ते सिडको पोलिस ठाणे, एन-७ बसस्टॉप, पार्श्वनाथ चौक.
3. एन-९, एन-११ जिजाऊ चौक ते टी.व्ही. सेंटर, स्वर्ग हॉटेल.
4. चांदणे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय.
5. एन-१ चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका.
6. सेव्हनहिल ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर.
नागरिकांनी या मार्गांवर प्रवास टाळावा आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*