महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, आणि खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. रावेर – शमिभा पाटील
२. सिंदखेड राजा – सविता मुंढे
३. वाशिम – मेघा किरण डोंगरे
४. धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
५. नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे
६. साकोली – डॉ. अविनाश नन्हे
७. नांदेड दक्षिण – फारुक अहमद
८. लोहा – शिवा नरंगले
९. छत्रपती संभाजीनगर पूर्व – विकास दांडगे
१०. शेवगाव – किसन चव्हाण
११. खानापूर – संग्राम माने
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सध्या राज्यात प्रमुख पक्षांचं एकजातीय राजकारण सुरू आहे, आणि आम्ही ते मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*