छत्रपती संभाजीनगर : शहरात गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 2,03,425/- रुपये किमतीचा 8.137 किलो गांजा (कॅनबीस वनस्पती) जप्त करण्यात आला आहे.
काल गुरुवार (दि.10 एप्रिल) रोजी, गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली होती की, दोन इसम गांजा विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात येणार आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सागर हॉटेलच्या मागील बाजूस, सिल्क मिल कॉलनी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.
पोलीसांनी अतिशय शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 2.03 लाख रुपये किमतीचा एकूण 8.137 किलो गांजा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी हा अंमली पदार्थ विनापरवाना, बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार संदीप तायडे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.
या यशस्वी कारवाईमुळे शहरातील गांजाच्या अवैध विक्रीवर मोठा आघात बसला असून, गुन्हे शाखेच्या त्वरित प्रतिसादामुळे एक मोठा अपप्रवृत्तीचा स्रोत बंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. नागरिकांनीही अशा अवैध धंद्यांविषयी माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*