छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी आज (२२ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाली असून, संबंधित मेल चेन्नई येथून आल्याची प्राथमिक माहिती आहे. मेलच्या माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या घटनेनंतर न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही क्षणातच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, न्यायालय सुरक्षा अधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे हे स्वत: घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिसराची पाहणी केली.

तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाची चार पथके, तसेच अँटी टेररिझम स्क्वॉडचे (ATS) पथकही घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांनी नाकाबंदी केली असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. परिसरातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू असून, नागरिकांना तपासणीनंतर प्रवेश दिला जात आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसली तरी पोलिस यंत्रणा सतर्क असून, मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,878 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क