छत्रपती संभाजीनगर : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत होणाऱ्या अनधिकृत बांधकाम, विनापरवानगी प्लॉट विक्री आणि पार्किंग जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात मोंढा व्यापारी असोसिएशन आणि भाजी मंडी व्यापारी असोसिएशन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर 24 आणि 25 एप्रिल रोजी दोन दिवस व्यापारी बंद पुकारण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

1. सन 2018 मध्ये मंजूर झालेल्या बाजार समिती आराखड्याचा बदल गाळेधारक व प्लॉटधारकांच्या परवानगीशिवाय करण्यात येऊ नये. नव्या आराखड्याला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

2. भाजी मंडईतील मुख्य रस्त्यावरील पार्किंगची जागा विक्री न करता, तिथे योग्य पार्किंगची सुविधा देण्यात यावी.

3. मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा पुन्हा सुरू करून अतिक्रमित रस्त्यांची मुक्तता करावी.

4. फ्रूट मार्केटमधील गाळा क्र. 1 ते 20 च्या मागील साईड मार्जिन जागेची विक्री थांबवावी.

5. व्यापाऱ्यांना लीजडीड व्यतिरिक्त कोणतीही अधिकृत कागदपत्रे मिळालेली नाहीत; म्हणून त्यांना नकाशा, बांधकाम परवानगी, कम्प्लीशन रिपोर्ट इत्यादी पुरवावेत.

6. 2018 मधील आराखडा कायम ठेवून नव्या बेकायदेशीर बांधकामांना तत्काळ आळा घालावा.

7. भाजी मंडईतील कचरा दररोज योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात यावा.

8. बाजार समिती आवारातील अवैध धंदे तत्काळ बंद करावेत.

9. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना बागडे संकुलातच जागा निश्चित करून बसवण्यात यावे.

10. कर्मचाऱ्यांमार्फत सुरू असलेली बेकायदेशीर वसुली बंद करावी.

11. पुरेशी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात यावी.

12. नियम व कायद्यांची पायमल्ली करून बाजार समिती अनधिकृत जागेची सर्रास विक्री करीत आहे, यामुळे भविष्यात व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून ही फसवणूक तत्काळ थांबवावी.

या मागण्यांसह बाजार समितीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवसांचा बंद पुकारला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सर्व व्यापारी संघटनांनी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

676 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क