छत्रपती संभाजीनगर शहरातील किरण चावडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत एका गोडाऊनमधून १६ लाख ६२ हजार ५६७ रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशचंद्र सुराणा आणि शुभम पेंढारे (२४, रा. न्यू हनुमान नगर) यांच्या “बॉम्बे सुपारी ट्रेडर्स” या दुकानात गुटख्याचा अवैध साठा असल्याची खबर अन्न व औषध विभागाला मिळाली होती. त्यानुसार, २६ सप्टेंबर रोजी गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

750 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क