घर आणि प्लॉट खरेदी-विक्रीशी संबंधित प्रलंबित फेर व पूर्वीच्या १२० फेरसाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला, एसीबीने शुक्रवारी (२७ सप्टेंबर) बीड बायपास रोडवरील तलाठी कार्यालयात पकडले. या कारवाईत तलाठी दिलीप रामकृष्ण जाधव (५५) आणि त्याला मदत करणारा रवी मदन चव्हाण (३१, रा. सातारा तांडा) यांना ९० हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली.
तक्रारदार, ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्समध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले ४० वर्षीय व्यक्ती, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्लॉट व घर खरेदी-विक्रीसाठी प्रलंबित फेर नोंदींसाठी तलाठ्याने १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली होती. यापूर्वी तक्रारदारांनी ३० हजार रुपये दिले होते, मात्र उर्वरित रक्कमेसाठी तलाठ्याने पुन्हा दबाव टाकला.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर, २५ सप्टेंबर रोजी एसीबीने पडताळणी केली आणि सापळा रचला. अखेर २७ सप्टेंबर रोजी तक्रारदारांकडून ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी दिलीप जाधव आणि रवी चव्हाण यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*