shivjayanti-celebration-aurangabad
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केली जात आहे. पारंपरिक वेशभूषा, भव्य आतषबाजी, आणि ढोल-ताशांच्या गजरात आज क्रांती चौकात मुख्य सोहळा पार पडणार आहे.
शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत. शिवपारायण, रक्तदान आणि अन्नदान यांसारखे कार्यक्रम शहरभर सुरू झाले आहेत. यंदा शहरात एकूण ९५ मिरवणुका निघणार असून त्यात सिडको हडको, गारखेडा, वाळूज महानगर, वाळूज गाव व क्रांती चौकातील मुख्य मिरवणूक विशेष आकर्षण ठरणार आहे.
शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहरात विविध ठिकाणी पूजाअर्चा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७३ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होणार असून, २४ ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. त्याशिवाय, ८ ठिकाणी शिवचरित्र पारायणे होणार असून यात इतिहासप्रेमींना महाराजांचे जीवनकार्य समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
शहरभर भगवे झेंडे फडकवले जात असून, ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावे सजवले आहेत. मोठ्या संख्येने शिवप्रेमी पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. ढोल-ताशांच्या निनादात, उत्साहाने गजबजलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत यंदाची शिवजयंती अविस्मरणीय ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*