छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात खोटे दस्तऐवज सादर करून मतदार यादीत नाव नोंदणी केल्याच्या प्रकारामुळे आठ जणांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदार नोंदणी अधिकारी यांनी संबंधित जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नायब तहसीलदार देविदास खटावकर यांना अधिकृत केले. खटावकर यांनी या संदर्भात सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपींमध्ये इम्रान मुनाफ बागवान (३८), रबिया हुसेन शेख (४५), मुमताज बेगम शेख (३८), शेख इसाक शेख रहेमत (३५), नसरीन वाहेद पठाण (२७), सोहेल सरवर खान (२३), सय्यद आरिफ बशीर (२७) आणि झाकीया सुलताना शहजाद खान (३६) यांचा समावेश आहे.
आरोपींनी मतदार नोंदणीसाठी खोटे दस्तऐवज सादर करताना दुसऱ्याचे लाईट बिल खाडाखोड करून जोडले होते. ऑनलाईन पडताळणी दरम्यान हे बिल त्यांचे नसून इतरांचे असल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाच्या तक्रारीनुसार, पुरावे खोटे असून, त्यात चुकीची संपादन केलेली असल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणाचा तपास सिटी चौक पोलीस करत असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*