शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून एका दाम्याला १ कोटी ५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबली जोडप्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जोडपे मयूर राजकुमार बाफना (४३) आणि श्रुती मयूर बाफना (३८, रा. उल्कानगरी) हे सध्या पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
फिर्यादी सुनील प्रभाकर वासे (५७) आणि त्यांच्या पत्नीला शेअर मार्केटमधून मोठा परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करण्यात आली. वासे दाम्पत्याने आरोपी बाफना यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या बनावट मार्क्स कॅपिटल अॅडव्हायसर प्रा. लि. कंपनीत ६५ लाख रुपये गुंतवले होते. सुरुवातीला विश्वास मिळवण्यासाठी काही रक्कम परत करण्यात आली, मात्र पुढे त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे सांगून पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी जोडपे सध्या फरार आहे.
________________________
*“द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*