घरकुल प्रस्तावांची यादी दाखल करण्याच्या कामात व्यस्त असलेल्या मनपा कर्मचाऱ्याला माजी नगरसेवक महेंद्र सोनवणे यांनी कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली असून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ईश्वर जाधव हे मनपात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरू असताना महेंद्र सोनवणे तीन साथीदारांसह त्यांच्या कार्यालयात आले. लाभार्थ्यांचे बिल लपवून दुसऱ्या पक्षाचे काम करण्याचा आरोप करत, त्यांनी जाधव यांचा गळा पकडला आणि त्यांना मारहाण केली. तसेच, सोनवणे यांनी “काय करायचं ते करून घे” अशा शब्दांत धमकी दिली.
या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सध्या पोलिस अधिक तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*