mahashivratri-special-temple-darshan-and-facilities
छत्रपती संभाजीनगर : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर शहरातील शिवमंदिरांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. शिवभक्तांची गर्दी लक्षात घेऊन, रोज ९ तास उघडी असणारी मंदिरे महाशिवरात्रीच्या दिवशी तब्बल २१ तास खुले राहणार आहेत. शहरातील ११८ शिवमंदिरांमध्ये भक्तिरसाने ओथंबलेले वातावरण पाहायला मिळणार आहे. खडकेश्वर, ओंकारेश्वर, दशमेश्वर आणि पारदेश्वर ही प्रमुख मंदिरे भाविकांसाठी विशेष दर्शनासाठी खुली राहतील.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगात १४ वर्षांनंतर मोबाइलसह दर्शन
१२वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात तब्बल १४ वर्षांनंतर भाविकांना मोबाइल नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महादेवाचे दर्शन टिपण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
शहरातील प्रमुख मंदिरांचे दर्शन वेळापत्रक:
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग : मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटे ४ पर्यंत
- खडकेश्वर मंदिर : पहाटे ४ ते रात्री १ पर्यंत
- दशमेश्वर मंदिर : पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत
- पारदेश्वर मंदिर : पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत
वेरूळला जाणाऱ्या भाविकांसाठी खास बससेवा
भाविकांच्या सोयीसाठी स्मार्ट सिटीच्या वतीने विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. ३० जणांच्या गटांसाठीही स्वतंत्र बस उपलब्ध असणार आहे. तसेच, एसटी महामंडळाने बुधवारी ५४ अतिरिक्त बस वेरूळ मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वेरूळ दर्शन गाइड :
- दर्शनासाठी ४ तास रांगेत थांबावे लागणार
- मंदिरात बेल, पुष्प, पत्र, खडीसाखर, दही नेण्यास अनुमती
- मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- साबुदाणा खिचडी, दही-खिचडीचा प्रसाद
- वेरूळ-कन्नड रोडवर दोन ठिकाणी पार्किंग सुविधा
भाविकांनी घ्यावयाची काळजी :
- रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावे
- कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
- रेटारेटी करू नये
महादेवाच्या कृपेने भाविकांना महाशिवरात्रीचा पावन सोहळा निर्भय आणि सुव्यवस्थित पार पाडता यावा, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*