आजचे राशीभविष्य 26 फेब्रुवारी 2025:

♈ मेष (Aries): आज तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि तुमचा प्रभाव वाढवाल. इतरांना मदत करण्यात आनंद मिळेल.

♉ वृषभ (Taurus): कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळच्या नातेवाईकांची भेट होईल. उष्णतेचे त्रास संभवतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

♊ मिथुन (Gemini): जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

♋ कर्क (Cancer): कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तुमच्या मताचा आदर केला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होतील.

♌ सिंह (Leo): तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.

♍ कन्या (Virgo): अति विचार करण्याचे टाळा. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील.

♎ तूळ (Libra): कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

♏ वृश्चिक (Scorpio): पैशांची उधळपट्टी टाळा. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत.

♐ धनु (Sagittarius): क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. वडिलोपार्जित कामे निघतील. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.

♑ मकर (Capricorn): शांत व संयमी विचार करा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

♒ कुंभ (Aquarius): बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्या. वडीलधार्‍यांचा सन्मान करा.

♓ मीन (Pisces): कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत मिळेल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

7,917 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क