cyber-crime-desk-in-aurangabad-police-stations

छत्रपती संभाजीनगर : शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, रॅन्समवेअर, सोशल मीडिया गैरवापर यांसारख्या गुन्ह्यांमुळे नागरिक अडचणीत सापडत आहेत. या गुन्ह्यांची जलद तपासणी व कारवाई करण्यासाठी आता शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर क्राईमसाठी स्वतंत्र डेस्क सुरू करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शहरातील १६ पोलिस ठाण्यांमध्ये हे विशेष डेस्क कार्यरत होतील. या डेस्कसाठी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदारांची विशेष नियुक्ती करण्यात येईल. त्यामुळे तक्रारींचे जलद निवारण होईल आणि नागरिकांना न्याय मिळेल.

गेल्या काही महिन्यांत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फिशिंग, डेटा चोरी, ऑनलाईन शॉपिंग फसवणूक, सोशल मीडियाद्वारे ब्लॅकमेलिंग अशा अनेक प्रकारांनी लोकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याआधी संभाजीनगर पोलिस आयुक्तालयात एकच सायबर पोलिस ठाणे होते, मात्र वाढत्या तक्रारींमुळे तपास लांबणीवर जात होता. त्यामुळे आता प्रत्येक पोलिस ठाण्यात वेगळी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

नागरिकांनी सायबर गुन्ह्यांना तातडीने तक्रार करावी आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सतर्क राहून आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

882 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क