Chhatrapati Sambhajinagar Police Honored with Child-Friendly Award

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना बालस्नेही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील विविध पोलिसांनी बालसुरक्षा आणि जनजागृतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान दिला जातो.

यंदा, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, पोलीस उपनिरीक्षक इसाक पठाण, पोलीस हवालदार रत्नसिंग चव्हाण, पोलीस हवालदार विजय तेलुरे, महिला पोलीस अंमलदार हिरा चिंचोळकर आणि वर्षा पवार यांची निवड करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस विभागाने बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहिमा राबवल्या. शाळा, वसतिगृहे, कोचिंग क्लासेस येथे जाऊन कायदेविषयक प्रबोधन करण्यात आले. मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना केल्या. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने अपहरणाच्या गुन्ह्यांचा तपास करून अनेक मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या उल्लेखनीय कार्यासाठी 3 मार्च 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई येथे पुरस्कार वितरण होणार आहे. या निवडीबद्दल पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, प्रशांत स्वामी, तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी निवड झालेल्या पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

563 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क