सिल्लोड तालुक्यातील दहा गावांतील कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न दिल्याने नाराज मराठा आंदोलकांनी गुरुवारी (दि. ३) अर्धनग्न अवस्थेत विभागीय आयुक्त कार्यालयात धडक दिली. तलाठी सजेवरील नोंदी तातडीने प्रमाणित करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या प्रकारामुळे काही काळ विभागीय आयुक्त कार्यालयात तणाव निर्माण झाला.
आंदोलकांनी उपायुक्त मिनियार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अनुपस्थित असल्याने त्यांनी तहसीलदार पवडे यांना निवेदन दिले. आंदोलकांनी प्रशासनावर मराठा समाजावर अन्याय करण्याचा आरोप केला आणि न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*