धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी आमदारांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याच संदर्भात शुक्रवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. संरक्षक जाळीमुळे त्यांचे प्राण वाचले. हे सर्व आमदार आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आरक्षणाच्या विरोधात सरकारकडे आक्रमक पवित्रा घेत आहेत.
आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरतीसाठी आंदोलन करत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू असूनही, अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मागितली होती, मात्र ती अपयशी ठरली. यामुळेच आक्रमक पावले उचलत आमदारांनी मंत्रालयात उडी मारण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले असले तरी, आंदोलकांचे समाधान झालेले नाही. या प्रकरणामुळे मंत्रालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आदिवासी आमदार आता ठिय्या आंदोलन करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*