महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा स्पष्ट केल्या जातील. महाराष्ट्रात एकूण २८८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
२८ नोव्हेंबर रोजी विद्यमान विधानसभा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे त्याआधीच्या काळात निवडणुका संपन्न होणार आहेत, असे आयोगाने पूर्वीच जाहीर केले होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल, ज्यामुळे राजकीय वातावरण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध पक्षांच्या तयारीवर लक्ष ठेवले जात असून, संभाव्य उमेदवारांची नावं आणि प्रचार योजनांचा थरार आता चांगलाच वाढणार आहे. महाराष्ट्रातील या निवडणुकांवर संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*