महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. केंद्रीय विज्ञान भवन, दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे.
निवडणूक वेळापत्रक:
निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2024
अर्जांची तपासणी: 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर 2024
मतदान: 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी: 23 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या निवडणुकीत मतदान प्रक्रियेला पूर्णतः व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे कॅप्चर केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विशेषतः 85 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना घरी बसून मतदानाची सुविधा दिली जाणार आहे, यासाठी निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.
महायुती आणि विरोधकांमध्ये रंगणार लढत
या निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुती विरुद्ध, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्य लढत होणार आहे.
मतदारांची आकडेवारी:
एकूण मतदार: 9 कोटी 63 लाख
पुरुष मतदार: 4.97 कोटी
महिला मतदार: 4.66 कोटी
नवमतदार: 20.93 लाख
तृतीयपंथी मतदार: 56,000+
85 वर्षांवरील मतदार: 12.48 लाख
दिव्यांग मतदार: 6.32 लाख
मतदान केंद्रांची माहिती:
एकूण मतदान केंद्रे: 1,00,186
शहरी मतदान केंद्रे: 42,604
ग्रामीण मतदान केंद्रे: 57,582
प्रत्येक केंद्रावर सरासरी मतदार: 960
विशेष सुविधा:
निवडणूक आयोगाने ‘सुविधा पोर्टल’ अॅप जारी केले आहे, ज्यावर मतदारांना तक्रार नोंदवता येईल. एखाद्या ठिकाणी गैरप्रकार घडल्यास किंवा मतदान प्रक्रियेत विलंब झाल्यास त्वरित निवडणूक आयोगाच्या टीमला माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.
मतदान काळातील निर्बंध:
एटीएमसाठी पैसे वाहून नेणाऱ्या वाहनांवर रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक काळात ड्रग्स, दारू आणि रोख रकमेच्या वाहतुकीवर कठोर नियंत्रण ठेवण्यात येईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*