छत्रपती संभाजीनगर: एकीकडे राज्यभरात रंगपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात एक नाट्यमय घटना घडली. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या टॉवरवर एक तरुण चढला आणि जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस आणि ‘आम्ही समुद्राचे’ पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तब्बल अर्धा ते पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर त्या तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात आले.

या तरुणाला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे समजते. मात्र, नेमकी कारणे काय आहेत, याचा उलगडा तो शुद्धीत आल्यानंतर होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेने रंगपंचमीच्या आनंदावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,206 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क