आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून उद्धव सेनेसाठी धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव सेनेचे शहरप्रमुख विजय वाकचौरे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.
विजय वाकचौरे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निकटवर्ती मानले जात होते. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव सेनेत खळबळ उडाली आहे. वाकचौरे यांच्या सोबत माजी सभापती विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेविका शोभा पुखराज काळे, विभागप्रमुख अॅड. योगेश ठाकूर, निखिल तिवारी, संतोष बोर्डे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर वाघचौरे आणि संतोष बारवाल यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा राजकीय उलटफेर उद्धव सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*