छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात १४ ऑक्टोबरच्या रात्री मोठी चोरीची घटना घडली. अवघ्या १५ मिनिटांत तब्बल १५ मोबाईल चोरीला गेल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दसऱ्यानिमित्त शहरात शनिवारी मोठी गर्दी होती, आणि रविवारी रात्री प्रवासासाठी बसस्थानकात मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक प्रवाशांचे मोबाईल लंपास केले.
अधिक माहिती मिळाल्यानुसार, या घटनेत कार्तिकराज मलिक यांचा २० हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेला असून, त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीमुळे बसस्थानकात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही प्रवाशांनी चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही.
या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, चोरांना लवकर पकडण्याची मागणी केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*