वैजापूर तालुक्यात मध्यरात्री पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम लुटणाऱ्या तिघा धाडसी आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली.
२८ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास धोंदलगाव शिवारातील साई उत्सव पेट्रोलपंपावर कामावर असलेल्या अशोक ठोकळ (वय ३९, रा. करंजगाव) यांना तिघा अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम लुटली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हा गुन्हा अविनाश उर्फ अवि दिलीप पवार (वय २६, रा. खिर्डी) आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदार विशाल उर्फ भैय्या पवार (रा. शेवता) आणि भाऊसाहेब उर्फ मंगेश पवार (रा. खिर्डी) यांच्यासोबत चोरीची कबुली दिली.
आरोपी वारंवार ठिकाणं बदलून पोलिसांची दिशाभूल करत होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण कारवाई करत तिघांनाही जेरबंद केले.
पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पेट्रोलपंपावरच्या लुटीचा पर्दाफाश झाला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वास वाढला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*