विश्रांतीनगरमध्ये बुधवारी (दि. १६ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता नशेच्या आहारी गेलेल्या नीलेश चव्हाण (१९) या तरुणाने २१ वर्षीय अमोल उर्फ नंदू दाभाडे याची एका घावातच हत्या केली. ही धक्कादायक घटना गल्ली क्र. २, विश्रांतीनगर येथे घडली. आरोपीने घटनास्थळी असलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याला काही तासांतच अटक केली.
हत्येपूर्वी, अमोल हा आपल्या मित्रांसोबत हनुमान मंदिरात गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी नीलेश आणि त्याचा मित्र कुणाल तिथे आले. नीलेशने अमोलला बाहेर बोलवले, मात्र त्याने नकार दिल्यावर, अचानकपणे नीलेशने धारदार चाकूने अमोलच्या छातीत वार केला. अमोलने प्रतिकार करत आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो जागेवरच कोसळला. तरुणांनी अमोलला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नीलेश चव्हाण हा आधीच रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, चार महिन्यांपूर्वी मंगळसूत्र चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. शहरात गुन्हेगारी आणि टवाळखोरांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*