शेतकऱ्याच्या बाजूने लागलेल्या निकालाची प्रत देण्यासाठी सहायक महसूल अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत आरोपीला रंगेहाथ पकडले.
सहायक महसूल अधिकारी दत्ता रमेशराव राऊत (वय ३७, वर्ग-३, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण) याने तक्रारदाराकडून ३,००० रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराच्या मृत आजोबांच्या नावे उदगीर तालुक्यातील लिंबगाव येथील जमिनीच्या मालकीचा निकाल २०१४ साली लागला होता. त्याचा अधिकृत निकालाची प्रत तक्रारदाराने मागितली असता, राऊतने त्यासाठी लाचेची मागणी केली.
तक्रारीनंतर एसीबीने राऊत याला महसूल न्यायाधिकरण कार्यालयाच्या परिसरात लाच घेताना पकडले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*