“Nath Shashti Yatra: 1000 Buses for 3 Lakh Warkaris”
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील प्रसिद्ध नाथषष्ठी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने तब्बल १ हजार बस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. २० ते २२ मार्चदरम्यान होणाऱ्या या यात्रेत सुमारे ३ लाख वारकरी प्रवास करणार असून, त्यांच्या सोयीसाठी खास नियोजन करण्यात आले आहे. पैठण येथे पार पडलेल्या ‘नाथषष्ठी यात्रा आढावा’ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
एसटी महामंडळाच्या नियोजनानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातून २००, जालना व बीड विभागातून अनुक्रमे २०० व १५० बस, तर अहिल्यानगर आगारातून १०० बस तैनात करण्यात येणार आहेत. या बसस्थानकांवर वारकऱ्यांसाठी पुरेशी बसण्याची सोय, सावली व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बैठकीस महामंडळाच्या उपव्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, तसेच अहिल्यानगर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगरच्या आगारप्रमुखांसह वाहतूक नियंत्रक उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*