मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत तिघांना संधी देण्यात आली असून, दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना उमेदवारी मिळाली आहे. रविवारी सकाळी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली.
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमधील निष्ठावान भाजप पदाधिकारी संजय केनेकर यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या संधीची प्रतीक्षा करत होते. त्यांचा पक्षनिष्ठेचा विचार करून भाजपने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, दादाराव केचे यांची विधानसभेसाठी उमेदवारी नाकारून ती सुमित वानखेडे यांना देण्यात आली होती. त्यामुळे केचे नाराज होते आणि त्यांनी बंडखोरीची तयारी केली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना पक्षाशी बांधील राहण्याचा सल्ला दिला होता. केचे हे भाजपचे जुने आणि कट्टर कार्यकर्ते आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांची नाराजी दूर करत विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या या निर्णयानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विधान परिषद निवडणुकीत या उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*