Oplus_131072

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. त्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “धनंजय मुंडे हे आरोपी असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. फडणवीस सत्य कबूल करण्यास तयार नाहीत.”

मुंडे प्रकरणावर घणाघात

जरांगे पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच स्वतःला उत्तर दिले आहे. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर बैठक घेतली होती. SIT आणि CID कडे पुरावे असूनही, फडणवीस सत्य स्वीकारत नाहीत. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, “धनंजय मुंडे लालची असून पद आणि पैशांसाठी काहीही करू शकतो.”

मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “अधिवेशनात तत्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. दोन वर्षांपूर्वी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत काहीही झाले नाही. शिंदे समिती सक्षमपणे काम करत नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांना २४ तास कामाला लावावे.”

बीड मारहाण प्रकरण व जालना चटके प्रकरण

बीडमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणावर बोलताना त्यांनी सूचक विधान केले की, “या प्रकरणात पोलिसच काही करू शकतात. संबंधित व्यक्तींशी (धस) संबंध असण्याची शक्यता आहे.” तसेच, जालना चटके प्रकरणावर त्यांनी भूमिका स्पष्ट करत म्हटले, “चुकीला पाठिंबा नाही. आम्ही सभ्य आणि प्रामाणिक लोक आहोत.”

सरकारला इशारा : “पुन्हा पेटून उठू”

जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला की, “आम्ही अजून आझाद झालो नाही, मात्र पुन्हा पेटून उठू. मराठा समाजाच्या हक्कांसाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ शकतो.”

धनंजय मुंडे यांच्यावर मोठे आरोप

वाल्मीक कराड प्रकरणात त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “धनंजय मुंडे यांनी स्वतःची संपत्ती कराड यांच्या नावावर ठेवली होती. या प्रकरणाचा तपास झाला, तर फडणवीस ३०२ (हत्या) कलमाचा उल्लेख करतील.” त्यांनी असा दावाही केला की, “३० ते ४० वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल, इतके पुरावे आहेत.”

सरकारवर तीव्र टीका

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “फडणवीस यांनी पुरावे आहेत असे सांगूनही कारवाई होत नाही. पोलिसांना विश्वासात घेऊन बैठक घेतली तर ट्रॅक डेटा आणि पुरावे मिळतील.”

या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

566 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क