dhananjay-munde-resignation-demand-by-cm-fadnavis
सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात आरोप होत असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट कोर्टात सादर केल्यानंतर विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली. भाजप आमदारांसह इतर पक्षांनीही मुंडेंच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेतली.
या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही बोलवण्यात आले होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सरकारची प्रतिमा मलीन होताना दिसतेय, त्यामुळे तुम्ही राजीनामा द्या.”
या निर्णयानंतर धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंडे यांना मंत्रिपदावर ठेवले तर सरकारवर टीका वाढू शकते, तर त्यांचा राजीनामा घेतल्यास राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. आता पुढील काही तासांत मुंडे काय भूमिका घेतात, यावर संपूर्ण घडामोडी अवलंबून असतील.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*