छत्रपती संभाजीनगरात MIM पक्षाला मोठा धक्का बसला आहे. MIM पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कादरी यांनी वंचित बहुजन आघाडी आणि MIM युती तुटण्यामागे जलील यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.
गफार कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर आणखी आरोप करत म्हटले आहे की, “इम्तियाज जलील हे भाजपला मदत करतात आणि पैसे घेण्यात पुढे आहेत. तसेच ते चिटर आहेत.” गफार कादरी हे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये MIM कडून उमेदवार होते आणि दोन्ही वेळा दुसऱ्या स्थानावर राहिले होते.
या राजीनाम्यानंतर संभाजीनगरातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*