आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अनेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपने यंदाच्या प्रचारासाठी एकूण ४० स्टार प्रचारकांना संधी दिली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्यातील प्रमुख नेते विनोद तावडे, अशोक चव्हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, आणि मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.
कोण आहेत स्टार प्रचारक यादीत, जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेल, विष्णू देव साई, मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायम सिंह सैनी, हेमंत बिस्वा, शिवराज सिंह चौहान, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, शिव प्रकाश, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, नारायण राणे, पियुष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, स्मृती इराणी, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहोळ, अशोक नेते, संजय कुटे, नवनीत राणा.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या या स्टार प्रचारकांच्या यादीला विशेष महत्त्व आहे. पक्षाने राज्यातील प्रमुख नेत्यांना प्रचारात उतरण्याची संधी दिल्यामुळे या निवडणुकीत भाजपचा जोरदार प्रचार अपेक्षित आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*