आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. किशनचंद तनवाणी यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता बाळासाहेब थोरात निवडणुकीतून लढणार आहेत. विधानसभा विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तनवाणी यांना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख पदातून पदमुक्त करण्यात आले असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. २०१४ साली घडलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, हे जर तनवानी यांना माहिती होते तर तनवाणी यांनी उमेदवारी का मागितली, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
या घडामोडीमुळे आगामी निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात उद्या आपल्या उमेदवारी अर्जाचा फॉर्म भरणार आहेत, ज्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक तीव्र होईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*