आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे औरंगाबाद मध्य विधानसभा उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी आपल्या उमेदवारीची माघार घेतली आहे. २०१४ साली घडलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. AIMIM चा उमेदवार पुन्हा निवडून येऊ नये, हे मुख्य कारण या माघारीमागे आहे.
तनवाणी यांनी आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे औरंगाबादमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*