midc-police-arrest-mobile-snatchers
गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : MIDC वाळूज पोलिसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या दोघा आरोपींना अटक करत 1.35 लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि एक चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे.
घटना कशी घडली?
दिनांक 23 मार्च 2025 रोजी रात्री 10.30 वाजता फिर्यादी दीपेश सूर्यवंशी (रा. डोंबिवली, मुंबई) हे ओअॅसीस चौक, पंढरपूर येथे थांबले असताना मोटरसायकलवर आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातातील 55,000 रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची जलद कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवत आरोपी आशिष रमेश गवई (वय 23) आणि मनोज सुखदेव शिंदे (वय 21, दोघे रा. काचिपुरा झोपडपट्टी, छत्रपती संभाजीनगर) यांना 24 मार्च रोजी पाईपलाइन रोडवर ताब्यात घेतले.
चोरीचा मुद्देमाल जप्त
अटक केलेल्या आरोपींकडून दोन मोबाईल (किंमत 55,000/- रुपये), 80,000/- रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल (MH 20 HC 9028) जप्त करण्यात आली. सदर मोटरसायकल दिनांक 22 मार्च रोजी रांजनगाव फाटा येथे जबरदस्तीने हिसकावण्यात आली होती.
या प्रकरणात इतर चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*