Ambelohol-beef-seized-police-action
गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : महाराष्ट्र शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी घातलेली असतानाही काही जण गोमांस विक्रीसाठी ताब्यात ठेवत असल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका प्रकरणात वाळुज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. 24) आंबेलोहोळ येथे मोठी कारवाई करत आरोपी अरबाज सलीम कुरेशी (रा. आंबेलोहोळ, ता. गंगापूर) याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 10 हजार 650 रुपये किमतीचे गोमांस आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी हा गावाबाहेरील एका मशिदीजवळ गोमांस ताब्यात ठेवून विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, हेडकॉन्स्टेबल टी. के. पवार आणि पोलीस अंमलदार बाळासाहेब देवबोने यांनी संयुक्तरित्या छापा टाकून आरोपीला जेरबंद केले.
याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब देवबोने यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गोवंश कत्तलीवर बंदी असतानाही असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*