विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, परंतु दिवाळीच्या सुट्यांमुळे प्रत्यक्ष माघारीसाठी केवळ ३१ ऑक्टोबर आणि ४ नोव्हेंबर हे दोनच दिवस उपलब्ध असणार आहेत. यामुळे अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेसाठी मर्यादित वेळ मिळणार असला तरी, या कालावधीत पक्षाच्या वरिष्ठांना बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी संधी मिळणार आहे.
यंदा दिवाळी सणाच्या सुट्या लक्षात घेता, १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा, आणि ३ नोव्हेंबरला भाऊबीज शासकीय सुटी असल्याने सलग तीन दिवस कार्यालये बंद असतील. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष माघारीसाठी ३१ ऑक्टोबर (दिवाळीपूर्वी) आणि ४ नोव्हेंबर (दिवाळीनंतर) हे दोनच दिवस मिळणार आहेत. या माघारीच्या कालावधीत महाविकास आघाडी व महायुतीतील इच्छुक, अपक्ष, तसेच बंडखोर उमेदवारांना समजूत काढण्याचे प्रयत्न पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना त्यांच्या निर्णयाबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळेल, तसेच अधिकृत उमेदवारांसाठी पक्षाच्या पाठींब्याचे आश्वासन मिळविण्याची संधीही मिळेल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*