कन्नड विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, तर त्यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव या भाजपच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. यामुळे निवडणुकीत पती-विरुद्ध-पत्नी असा थरारक सामना रंगणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या विरोधात पत्नीला उमेदवारी देण्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर घर फोडल्याचा आरोप केला आहे. “माझ्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून भाजपने तिकीट दिले आहे. माझ्या विरोधात माझीच पत्नी उभी करण्याचा हा प्रकार आहे, याचा मी जाहीर निषेध करतो,” असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.
दिवाळीच्या दोन दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे हर्षवर्धन जाधव यांनी दुःख व्यक्त केले असून, “मी आणि माझी आई एवढेच उरलो आहोत. ठोकून काढू, शेवटी धर्मयुद्ध आहे,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
कन्नड मतदारसंघात या निवडणुकीत उदयसिंग राजपूत हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान आमदार देखील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कन्नड मतदारसंघात तिरंगी सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*