मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीनंतर मराठा, दलित आणि मुस्लिम समाजांचे नवे समीकरण जुळल्याची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जरांगे यांच्या या निर्णयाने राज्याच्या सत्तासमीकरणाला कलाटणी मिळणार का, यावर आता चर्चा रंगली आहे.
बैठकीला मुस्लिम व दलित समाजातील धर्मगुरू आणि प्रमुख नेते उपस्थित होते. जरांगे पुढे म्हणाले की, “मतदारसंघातील इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. ३ तारखेला कोणत्या जागी कोणता उमेदवार असेल, हे ठरवले जाईल. एकच उमेदवार निवडला जाईल व इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे आहे.” मराठा समाजाच्या एकत्रीकरणानंतर आता मुस्लिम आणि दलित समाज देखील सोबत आल्याने समीकरण तयार झाले आहे आणि बदल होणार असल्याचा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
“मी फडणवीस साहेबांना गोरगरीबांना हलक्यात घेऊ नका, असे सांगितले होते,” असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजाला मुक्त करण्याचा संकल्प केला. “माझी मान कापली गेली तरी मी लढणारच,” असे दृढपणे सांगत त्यांनी आपल्या लढाईचे संकेत दिले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*