औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या एकूण ५६ तक्रारी दाखल झाल्या असून, त्या तक्रारींवर १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. सर्वाधिक २२ तक्रारी सिल्लोड मतदारसंघातून आल्या असून, त्यानंतर औरंगाबाद मध्य व औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून प्रत्येकी ७, पैठण ५, औरंगाबाद पश्चिम ४ आणि वैजापूर मतदारसंघातून ५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
आचारसंहिता कक्षाची तत्परता विधानसभा
निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रारी नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजील मोबाइल अॅप आणि १९५० टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रारींच्या स्वरूपात पक्षाच्या चिन्हांचे फलक, विकासकामांच्या कोनशिलांवरील झाकण काढणे, सार्वजनिक ठिकाणी झेंडे लावणे आदी गोष्टींचा समावेश आहे.
सिल्लोडमध्ये तक्रारीवर विलंब, अधिकाऱ्यांना नोटीस
सिल्लोड मतदारसंघातील एका प्रकरणात तक्रारीचे निराकरण शंभर तासांमध्ये न झाल्यामुळे तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व तक्रारींसाठी प्रशासनाने शंभर तासांत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात काही अधिकारी सहभागी होत असल्याच्या तक्रारी देखील निवडणूक विभागाकडे आल्या आहेत. हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सीईओकडे वर्ग करण्यात आले आहे. या तक्रारींचा अहवाल प्राप्त होताच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*