विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला आहे. उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, बैठका, आणि कॉर्नर सभांवर भर देत आहेत. 9 नोव्हेंबर 2024 पासून राज्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा जोर धरू लागणार आहेत.
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याची राजधानी असल्याने, राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री, तसेच राज्यातील प्रमुख पक्षांचे नेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बजरंग चौकातील सभेची तारीख 9 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. तसेच एआयएमआयएमचे अकबरोद्दीन ओवेसी यांची आमखास मैदानावर सभा नुकतीच पार पडली.
महायुतीसाठी प्रचारासाठी स्टार प्रचारकांची मोठी यादी तयार करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेतेही मैदानात उतरणार आहेत. या प्रचारसभांमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि जे. पी. नड्डा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत.
प्रचारसभांसाठी वार्ड स्तरावरून कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी नियोजन केले जात आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सर्व बाबींची काळजी घेतली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*