आजच्या आधुनिक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी फक्त कार्यकर्त्यांचे योगदान पुरेसे नाही. संपूर्ण नियोजन, गोपनीयता, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी वॉररूम आवश्यक घटक ठरत आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराचा खर्च ४० लाखांवर मर्यादित असला, तरी या वॉररूममधील कार्यप्रणाली आणि नियोजन यामुळे एक नव्या पद्धतीचा निवडणूक लढा उभा राहतो. अनेक उमेदवारांनी आधीच आपल्या वॉररूम उभ्या करून त्या अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज केल्या आहेत. या खोलीत संगणक, लॅपटॉप, आणि मोबाईल इंटरनेट यासारख्या सुविधा असून, प्रत्येक तासाला मतदारसंघाची माहिती, उमेदवाराचे नियोजित दौरे, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या इत्यादी माहिती त्यावर प्रदर्शित केली जाते.

वॉररूममध्ये नेमके काय घडते?

या वॉररूममध्ये उमेदवाराचा प्रभाव वाढवण्यासाठी सोपवलेली कामे, भाषणातील मुद्दे, प्रचाराच्या दिशानिर्देश आणि सोशल मीडियावर उमेदवाराची प्रतिमा टिकवण्यासाठीच्या हालचाली नियोजित केल्या जातात. याशिवाय उमेदवारासोबतच असणारे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांच्याकडून मिळालेल्या छायाचित्रांवर एडिटिंग करून समाजमाध्यमांतून त्यांचा प्रचार करण्यात येतो.

विरोधकांवर नजर आणि प्रत्युत्तराची रणनिती

विरोधकांच्या प्रचारावर लक्ष ठेवून, त्यांचे बलस्थान ओळखणे आणि त्यावर प्रत्युत्तर देण्याचे नियोजन येथेच होते. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रभावी उत्तर देण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत असते, ज्यामुळे उमेदवाराचे स्थान मजबूत ठेवता येते.

राजकीय पक्षांची वॉररूम: मतदारांशी थेट संवादाचा केंद्रबिंदू

प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या बजेटनुसार वॉररूम तयार केली आहे. त्यातून मतदारसंघातील प्रत्येक हालचालीची माहिती मिळवून पक्षाच्या धोरणांचा प्रचार केला जातो. मतदारांपर्यंत संदेश पोहोचवून त्यांच्या अपेक्षा ओळखण्यासाठी वॉररूम एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधन ठरले आहे.

वॉररूममधील गोपनीयता आणि प्रभावी नियोजन हेच आधुनिक निवडणुकीत यशाचे मोजमाप ठरत आहे, आणि हे नवा निवडणूक लढानवा रंग घेत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

690 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क