छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेदरम्यान भाजप आमदार प्रशांत बंब यांचा संताप उफाळून आल्याची घटना घडली आहे. विकासकामांबाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला धमकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गवळी शिवारा गावात, रेल्वेसंबंधित मागील आश्वासनांच्या पूर्ततेबाबत विचारणा केल्याने आमदार बंब भडकले आणि तरुणाला सभेतून बाहेर काढण्याचा आदेश दिला.

तरुणाने पंधरा वर्षे झाली तरी कामे अपूर्ण आहेत, असे सांगताच, प्रशांत बंब यांनी, “माझ्या विरोधात गेला तर पस्तावशील,” असे उद्गार काढत धमकी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि सभेत धक्काबुक्की झाली.

या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट करत भाजपवर टीका केली. “सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारले की भाजप नेत्यांना चर्चेत सहभागी होणे अवघड का होते? सामान्य प्रश्नांवर अशी धमकी देण्याची शिस्त भाजप शिबिरात शिकवली जाते का?” असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, याआधीही प्रशांत बंब यांनी वेरूळ येथील ग्रामस्थांना देखील प्रश्न विचारल्यावर धमकावल्याचा आरोप झाला होता.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,736 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क