नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन महायुतीला पराभूत केले आहे. याच यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही करण्याची गरज आहे, असे मत आंबेडकरवादी संविधान बचाव समितीने पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

समितीच्या मते, मनुवादी वर्ण व्यवस्थेने भारताला हजारो जातींमध्ये विभागून दलित, वंचित आणि बहुजन समाजाला शिक्षण, रोजगार आणि स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले आहे. या व्यवस्थेमुळे सामाजिक विषमता वाढून देशाची प्रगती खुंटली आहे. समाजातील ही विषमता दूर करून सामान्य भारतीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. त्यामुळे भारताला आधुनिक राष्ट्र म्हणून ओळख मिळाली.

तथापि, काही संघटना व पक्ष संविधान बदलण्याचे प्रयत्न करीत आहेत. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या नावाखाली मनुवादी विचारधारा रुजवण्याचे प्रयत्न करणाऱ्या भाजपा आणि RSS सारख्या संघटनांपासून संविधानाला धोका आहे, असे समितीने स्पष्ट केले. संविधानाचे रक्षण करण्यासाठी लोकशाही आणि संविधानावर विश्वास असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विधानसभेत विजयी करण्याचे आवाहन समितीने केले.

यासंदर्भात आंबेडकरवादी संविधान बचाव समितीने पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजूभाऊ शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

158 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क