छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाल भोसले नावाच्या तरुणावर हा हल्ला करण्यात आला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विशाल भोसले आणि वरून भिल्लारे या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की वरून भिल्लारे याने विशालवर थेट चाकूने हल्ला केला. हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला लवकरच ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*