Oplus_131072

वाळूज महानगर (प्रतिनिधी: गजानन राऊत) :  सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साजापूर-करोडी गावाजवळ, तनवाणी शाळेसमोर असलेल्या लोकप्रिय ग्रँड सरोवर हॉटेलला बुधवारी सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.


आग इतकी भयानक होती की काही मिनिटांतच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. हॉटेलच्या किचनमधून आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, काही क्षणांत ती संपूर्ण हॉटेलमध्ये पसरली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवून अग्निशामक विभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच बजाज ऑटो, गरवारे कारखाना आणि शहरातून आलेले एकूण ४ ते ५ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले व शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हॉटेलच्या आत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आग नियंत्रणात आली असून तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मात्र, नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,332 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क