Political Leader Harassment Case
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढली असून, त्यापैकी दोघांची ओळख पटली आहे. या तिघांनी पीडित महिलेकडून शरीरसुखाची मागणी देखील केली.
पीडितेने यासंदर्भात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड यांच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मागील काही दिवसांपासून महिलेचा पाठलाग करत होते. त्यांनी तिचे फोटो काढून अनैतिक मागणी केली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आरोपी अशोक पवार हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून, गायकवाड आणि तो पीडितेच्या ओळखीचे आहेत. सुरुवातीला त्यांनी तिला ‘तू खूप सुंदर दिसतेस, तुझ्याशी मैत्री करायची आहे,’ असे सांगितले. मात्र, तिच्या दुर्लक्षानंतर आरोपींचा छळ वाढला. अखेर त्यांनी तिचे फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींविरोधात विनयभंगासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*