छत्रपती संभाजीनगर : “वेगावर नियंत्रण ठेवायला हवं”, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करणारा गंभीर अपघात सोमवारी शेंद्रा MIDC परिसरात घडला. समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे प्रवास करणारी एमएच १३ डीवाय ९६९१ ही कार बनगाव लहुकी फाट्याजवळील दुभाजकाला जोरात धडकली. धडकेनंतर काही क्षणातच कार पेटली आणि काही मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली.
या कारमध्ये दोन महिला, एक ज्येष्ठ व्यक्तीसह पाच प्रवाशी होते. प्रसंगावधान राखत सर्वांनी वाहनातून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. प्रवासी फक्त किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
या अपघाताचा व्हिडिओ मंगळवारी समोर आला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अनिकेत दत्तात्रय झिरपे, दत्तात्रय गणपत झिरपे, केतकी दत्तात्रय झिरपे, कोमल अशोक गायकवाड आणि कल्पना अशोक गायकवाड अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत कार पूर्ण जळाली होती.
या ठिकाणी हा तिसरा अपघात असल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे. चौकातील गतिरोधकांचे चुकीचे नियोजन प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. करमाड पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*